मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, भारतीय मुस्लिमांसाठी केवळ भारतीय असणे पुरेसे नाही, तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mehbooba Mufti

मेहबूबा म्हणाल्या, भारतीय मुस्लिमांसाठी भारतीय असणे पुरेसे नाही, तर...

मला भीती वाटते की भाजप फक्त हिजाबवर (Hijab controversy) थांबणार नाही. त्या मुस्लिमांना सर्व चिन्हे नष्ट करायची आहेत. भारतीय मुस्लिमांसाठी केवळ भारतीय असणे पुरेसे नाही, तर त्यांनी भाजप असणे आवश्यक आहे, असे म्हणत पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी भाजपवर निशाणा साधला.

हिजाबवरून कर्नाटकात सुरू असलेला वाद देशभर गाजत आहे. या वादावरून विरोधक सातत्याने भाजपवर हल्लाबोल करीत आहेत. एएनआय न्यूज एजन्सीनुसार, जम्मू आणि काश्मीर हा राजकीय मुद्दा आहे. परंतु, भाजपला सामुदायिक प्रकरण बनवायचे आहे. कलम ३७० रद्द केल्याने हा प्रश्न सुटला नसून तो अधिक गुंतागुंतीचा झाला आहे, असे मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी रविवारी श्रीनगरमध्ये सांगितले.

हेही वाचा: WhatsApp : आता डीपीसोबत ठेवता येणार कव्हर फोटो; नवीन फीचरवर काम

आज नाही तर उद्या केंद्र सरकारला याबाबत पाकिस्तानशी चर्चा करावी लागेल. जम्मू-काश्मीरमध्ये जितका त्रास आणि रक्त सांडले जाईल तितका भाजपला फायदा होईल हे खरे आहे, असेही मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या. देश हा सर्वांसाठी समान आहे. तुम्हाला काय घालायचे आहे, काय खायचे आहे आणि कसे जगायचे आहे याचा तुम्हाला अधिकार आहे. प्रत्येकाचा स्वतःचा धर्म आहे, असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) हिजाब वादाबद्दल (Hijab controversy) म्हणाले.

Web Title: Mehbooba Mufti Hijab Controversy Bjp Muslim

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top