esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Mehbooba Mufti

काश्मीरींवरील कारवाईचे गंभीर परिणाम भोगावे लागतील - मुफ्ती

sakal_logo
By
सुधीर काकडे

काश्मीरमध्ये अल्पसंख्यांक समुदायाच्या लोकांच्या नुकत्याच झालेल्या हत्येनंतर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी केंद्र सरकारला काश्मिरींच्या सामूहिक अटकेच्या विरोधात सरकारला इशारा दिला. जम्मू -काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी 500 हून अधिक लोकांना ताब्यात घेतल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुफ्ती यांनी माध्यमांना सांगितले की, आपल्याला माहिती आहे काश्मिरी पंडित आणि श्रीनगरमध्ये एका शीख महिलेच्या मृत्यूनंतर, स्थानिक प्रशासन काश्मीरी लोकांच्या विरोधात अत्याचार सुरू करेल. सरकार अपयश लपवण्यासाठी ही कारवाई करत असल्याचा देखील त्यांनी आरोप केला.

महेबुबा मुफ्ती यावेळी म्हणाल्या की, स्थानिक प्रशानाकडून कडक कारवाई सुरू झाली असून, ते काश्मिरींना गोळा करुन त्यांना घेत आहेत. प्रशासनाकडे विरोधात कोणतेही पुरावे नाहीत असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. तसेच ताब्यात घेतलेल्या लोकांची ओळख आणि त्यांचे गुन्हे उघड करण्याची मागणी मुफ्ती यांनी केली. “जर त्यांनी लोकांना अशाच प्रकारे ताब्यात घेणं सुरू ठेवलं तर त्याचे धोकादायक परिणाम होतील आणि सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल,” असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

जम्मू-काश्‍मीरमध्ये सामान्य नागरिकांवर हल्ले वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज मोठी कारवाई करत लष्करे तैयबा, जैशे महंमद, अल बद्र आणि द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनांसाठी काम करणाऱ्या सुमारे नऊशे जणांना ताब्यात घेतले. या सर्वांनी दहशतवादाला पाठिंबा दिल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली असल्याचे जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: काश्‍मीरमध्ये मोठी कारवाई; दहशतवाद्यांशी संबंधित 900 जण ताब्यात

दरम्यान, जम्मु काश्मीर मध्ये मागच्या काही दिवसांत दहशतवाद्यांनी केलेल्या कारवायांमुळे पुन्हा एकदा खोऱ्यांत अशांतता वाढल्याचं दिसतंय. जम्मू काश्मीरमधील धार्मिक तेढ निर्माण व्हावं या हेतुनं दहशतवादी जाणीवपुर्वक बीगर मुस्लीमांना लक्ष करत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यातच काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रीय सुरक्षा दलांवर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी सीआरपीएफकडून मारल्या गेलेल्या एका भारतीय नागरिकाच्या मृत्यूवर देखी प्रश्न उपस्थित केला आहे.

loading image
go to top