शिवाजी महाराजांचे दिल्लीत स्मारक उभारा; खासदार उदयनराजे

खासदार उदयनराजे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी
memorial of Shivaji Maharaj in Delhi MP Udayanaraje s demand to Union Home Minister Amit Shah
memorial of Shivaji Maharaj in Delhi MP Udayanaraje s demand to Union Home Minister Amit Shahsakal

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक राजधानी दिल्लीत उभारले जावे, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व भाजप खासदार उदयनराजे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना भेटून केली. राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखणारा कायदा आणावा तसेच शिवरायांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे या मागण्याही त्यांनी केल्या आहेत.

या भेटीदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांना दिलेल्या पत्रात उदयनराजे यांनी शिवरायांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी करताना म्हटले आहे, की स्थापत्यशास्त्र, सामाजिक शास्त्र, व्यवस्थापन, राजकीय, कायदा आणि प्रशासन यासारख्या विविध अंगांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत संशोधन, अध्ययन आणि लेखन व्हावे यासाठी उच्चस्तरीय राष्ट्रीय समिती स्थापन केली जावी.

अप्रकाशित दस्तावेज, छायाचित्रे, शस्त्रास्त्रांची माहिती मिळविण्यासाठी पुरातत्व संशोधन विभाग, अभिलेखागाराची मदत घेतली जावी. तसेच युरोपातील वेगवेगळ्या देशांमध्ये शिवरायांच्या संदर्भात असलेली माहिती देखील भारत सरकारने मिळवावी.

अलीकडच्या काळात झालेली, छत्रपती शिवरायांचा अवमान करणारी वक्तव्ये पाहता राष्ट्रपुरुषांची अवमानना रोखण्यासाठी कायदा तयार करून तो संसदेत मंजूर करावा. चित्रपटासारख्या माध्यमांत ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली होणारी ऐतिहासिक तथ्यांचे होणारे विकृतीकरण, गोंधळ आणि सामाजिक तेढ वाढविणारे असल्याने ते रोखण्यासाठी समिती स्थापन केली जावी.

खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या भेटीची ट्विटद्वारे माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांचे चरित्र व कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, अशी मागणी शहा यांच्याकडे केली, असे ट्विट त्यांनी केले. या भेटीदरम्यान वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com