Sandhya Devnathan: फेसबुक, व्हॉट्सअॅपचा कारभार आता संध्या देवनाथन पाहणार; Meta Indiaची घोषणा

या महिन्याच्या सुरुवातीला मेटा इंडियाचे अध्यक्ष अजित मोहन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
Sandhya Devnathan: फेसबुक, व्हॉट्सअॅपचा कारभार आता संध्या देवनाथन पाहणार; Meta Indiaची घोषणा

Meta India Vice President and Head : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी असलेल्या मेटा इंडियाच्या उपाध्यक्ष आणि प्रमुखपदी संध्या देवनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेटानं गुरुवारी ही घोषणा केली. या महिन्याच्या सुरुवातीला मेटा इंडियाचे अध्यक्ष अजित मोहन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. (Meta announced the appointment of Sandhya Devanathan as the Vice President of Meta India)

नियुक्ती निश्चित झाल्यानंतर संध्या देवनाथन १ जानेवारी २०२३ पासून आपला पदभार स्विकारणार आहेत. त्या थेट डॅन निअरी यांना रिपोर्ट करणार आहेत. APAC रिजनसाठी त्या मेटाच्या उपाध्यक्ष असतील. संध्या देवनाथन या गेमिंग एक्सपर्ट असून महिलांना या क्षेत्रात येण्यासाठी त्या प्रोत्साहित करतात.

Sandhya Devnathan: फेसबुक, व्हॉट्सअॅपचा कारभार आता संध्या देवनाथन पाहणार; Meta Indiaची घोषणा
Covaxin Covid Vaccine Fraud: "राजकीय दबावामुळं 'कोव्हॅक्सिन' घाईनं बाजारात आणली"; नव्या खुलाशानं खळबळ!

देवनाथन या सन २०१६ पासून फेसबुकसोबत काम करत आहे. त्यांनी कंपनीचा कारभार सिंगापूर आणि व्हिएतनाममध्ये वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. सन २०२० मध्ये संध्या देवनाथन यांनी APAC क्षेत्रात गेमिंगचं नेतृत्व केलं आहे. गेमिंग इंडस्ट्रीत काम करण्यासाठी मेटानं प्ले फॉरवर्ड हा एक मोठा प्रोजेक्ट उभारला असून त्याचं गोल्बली लीड संध्या देवनाथन करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com