
Metro Construction News : मेट्रोचं काम सुरू असलेलाच खांब कोसळला; दोघांचा मृत्यू
बंगळुरू - बंगळुरुच्या नागवाडामध्ये मेट्रोचा बांधकाम सुरू असलेला खांब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण जखमीही झाला आहे. या अपघाताला दुजोरा देताना पोलिसांनी सांगितलं की, सकाळी 10.45 च्या सुमारास मेट्रोचे बांधकाम सुरू असलेला खांब कोसळला. (metro under construction pillar collapses in bengaluru )
हेही वाचा: Shivaji Maharaj: 'शिवरायांच्या स्वराज्याचा अंत पेशवा ब्राह्मणांनी केला', पुस्तकावर बंदीची मागणी
सविस्तर वृत्त असे की, कोसळलेल्या खाबाला एका दुचाकीची धडक बसली. या दुचाकीवर चार जण स्वार होते. दुचाकीवर लोहीत याच्यासोबत त्याची पत्नी तेजस्विनी आणि त्यांची जुळी मुलंही होती. तेजस्विनी आणि तिचा मुलगा विहान यांचा या अपघातात मृत्यू झाला. त्याचबरोबर या अपघातात लोहित जखमी झाला आहे.
हेही वाचा: Ajit pawar: "उपटसुंभ... त्याला मी" ; अजित पवार भर पत्रकार परिषदेत संतापले
या अपघातात तेजस्विनी आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लोहित आणि त्यांच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, दुचाकीवरील पती-पत्नी दोघांनीही हेल्मेट घातले होते.