
नवी दिल्ली : दिवंगत चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी १९५०मध्ये साकारलेले ‘ग्राम यात्रा’ हे चित्र तब्बल १३.८ दशलक्ष अमेरिकी डॉलरला अर्थात ११८ कोटी रुपयांना लिलावात विकले गेले आहे. आतापर्यंत सर्वांत महाग विकल्या गेलेले आधुनिक चित्रशैलीतील भारतीय चित्र म्हणून या चित्राने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.