दिल्लीत पुन्हा आगीचे तांडव; 9 जण ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 23 डिसेंबर 2019

काय घडले?
उत्तर दिल्लीतील किरारी परिसरात एक तीन मजली गोदामाला आग लागली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घठना घडली. त्यावेळी गोदामात जवळपास 20 हून अधिकजण होते. आगीच्या घटनेनंतर अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. परंतु, तोपर्यंत 9 जणांना गुदमरून आणि भाजून मृत्यू झाला होता.

नवी दिल्ली : दिल्लीत आगीच्या घटनेमुळे पुन्हा नऊ जणांना जीव गमवावा लागला आहे. एका कपड्याच्या गोदामाला लागलेल्या आगीत 9 जण ठार झाले आहेत तर 10 जण जखमी झाले आहेत. यातील काही जण गंभीर असल्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मध्यरात्रीच्या घटनेनंतर आगा आटोक्यात आणली असली तरी, तोपर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला.

काय घडले?
उत्तर दिल्लीतील किरारी परिसरात एक तीन मजली गोदामाला आग लागली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घठना घडली. त्यावेळी गोदामात जवळपास 20 हून अधिकजण होते. आगीच्या घटनेनंतर अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. परंतु, तोपर्यंत 9 जणांना गुदमरून आणि भाजून मृत्यू झाला होता. जखमींना जवळच्या संजय गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन मजली कपड्यांच्या गोदामा कोणत्याही प्रकारची अग्निशमन यंत्रणा नव्हती, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली. गोदामात जाण्यासाठी एकच चिंचोळा जिना होता, असेही स्पष्ट झाले आहे. 

43 जणांचा गेला होता बळी
दिल्लीतच काही दिवसांपूर्वी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत 43 जणांचा बळी गेला होता. अनाज मंडी परिसरातील राणी झाशी रोड येथे ही घटना घडली होती. मृतांमध्ये कामगारांची संख्या जास्त होती. पहाटे पाच वाजता ही आग लागली होती. तेथेही अगदी चिंचोळ्या जागेत कारखाना चालवला जात होता. कामगार काम केल्यानंतर तेथेच झोपत होते आणि झोपेतच त्यांचा होरपळून मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: midnight fire at cloth godown in north delhi 9 dead 10 injured