भारत-चीन वादाबाबत दलाई लामांचं सूचक विधान; म्हणाले, ''लष्करी शक्तीचा''...

भारत आणि चीनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सीमावाद सुरू असून यावर अद्यापपर्यंत ठोस तोडगा निघालेला नाही.
Dalai Lama
Dalai Lama

श्रीनगर : भारत आणि चीनच्या सीमावादाबाबत बौद्ध धर्मगुरू दलाई लामा (Dalai Lama) यांनी मोठे आणि सूचक विधान केले आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश भारत आणि चीन यांनी त्यांच्यामध्ये असलेले सीमावाद (India China Border) संवादातून सोडवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. तसेच आजच्या जगात लष्करी शक्तीचा वापर इतिहास जमा झाला आहे त्यामुळे तोडग्यासाठी याचा वापर करण्यात अर्थ नसल्याचेही लामा यांनी म्हटले आहे. दलाई लामा पुढील एक महिन्यासाठी लेह लडाखच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. लडाखला रवाना होण्यापूर्वी त्यांनी जम्मू येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील विधान केले आहे. (Dalai Lama Latest News In Marathi)

Dalai Lama
Corona Update: धोका वाढला! राज्यातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ

लामा म्हणाले की, भारत आणि चीन या दोन्ही शेजारील देशांमध्ये शांतता प्रस्थापित होणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या जगात शांतता आणि बंधुभावाची सर्वाधिक गरज आहे. जातीवाद ही लहान मनाच्या माणसांची निर्मिती असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी वर्णभेदाबाबत दक्षिण आफ्रिकेत अहिंसेचा संदेश दिल्याबद्दल महात्मा गांधींचे कौतुक केले.

आज चीनच्या लोकांना समजले आहे की, तिबेटी बौद्ध धर्म हा विज्ञानावर आधारित धर्म आहे. काही चिनी कट्टरपंथी त्याला फुटीरतावादी मानतात. मात्र, सर्वसामान्यांना सत्य समजते असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोरोनाबाबत सावध राहण्याचा संदेश दिला. कोरोनाने समाजाला खूप काही शिकवले आहे.

Dalai Lama
चीनची दादागिरी..म्हणतो, 'दलाई लामा आम्हीच निवडणार'

2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाल्यानंतर दलाई लामा प्रथमच भारताच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे विशेष दृष्टीकोनातून बघितले जात आहे. त्याशिवाय दुसरे प्रमुख कारण म्हणजे 2020 मध्ये भारत आणि चीन यांच्यातील गलवान संघर्ष आणि त्यानंतर वाढलेल्या तणावानंतर दलाई लामा यांची ही पहिलीच लेह-लडाख भेट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com