
दुधाला देखील हमीभाव द्यावा: राजू शेट्टी
दुधाला देखील हमीभावाच्या कक्षेत आणावं, २४ पिकांव्यतिरिक्त भाजीपाला फळं आणि दुध यांना देखील हमीभावात समावेश करावा अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलीय. कोल्हापूर येथे होत असलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या राज्य कार्यकारीणीमध्ये ते बोलत होते. १ मे ला संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभेमध्ये दुधाला हमीभाव देण्याचा ठराव करण्यात यावा, किमान दहा हजार ग्रामपंचायतीमध्ये हा ठराव करण्याविषयी शेट्टींनी मार्गदर्शन केलं.
जसा असंघटीत कामगारांसाठी किमान वेतन कायदा आहे. तसाच कायदा संसदेने असंघटीत शेतकऱ्यांसाठी करण्याविषयीचा ठराव देखील ग्रामसभेमध्ये करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्याचं सुतोवाच राजू शेट्टींनी केलंय.
किमान हमीभावाचा कायदा देशाच्या संसदेने मंजूर करावा असा ठराव गावसभेत करुन घ्यावा. फक्त सरकार जाहिर करत असलेल्या शेतामालालाच नाही. तर नाशवंत भाजीपाला ज्यात टोमॅटो, वांगी असेल, दोडका, कोबी या सगळ्या भाजीपाल्याला त्याचबरोबर द्राक्ष डाळींब, कांदा अन् बोर अशा फळपिकांना नारळ यांना देखील हमीभाव देण्यात यावा.
हेही वाचा: राजू शेट्टींची मोठी घोषणा; 'स्वाभिमानी' मविआतून बाहेर
दुधाला देखील हमीभावाच्या कक्षेत आणावं असा कायदा संसदेने करण्यासंबंधीचे हे ठराव घेऊन, दिल्लीला MSP किसान मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रपतींची भेट घेणार असून त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होत असल्याची माहिती शेट्टींनी दिली.
Web Title: Milk Should Add Under Msp Category Says Raju Shetti In Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..