अर्थमंत्री सीतारामन म्हणतात, 'ओला-उबरमुळेच मंदी'

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

लाखो लोक ओला-उबरसारखी ऍप बेस्ड टॅक्‍सी सेवा वापरतात, त्याचा फटका ऑटोमोबाइल उद्योगाला बसला आहे, असे विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी आज केले. ऑटोमोबाइल क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण असून, काही कंपन्यांनी उत्पादन थांबवले आहे. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ऑटोमोबाइल क्षेत्रातील मंदी ही लोकांच्या मानसिकतेत झालेल्या बदलामुळे आणि बीएस-मुळे आली असल्याचे सांगितले. 

नवी दिल्ली : लाखो लोक ओला-उबरसारखी ऍप बेस्ड टॅक्‍सी सेवा वापरतात, त्याचा फटका ऑटोमोबाइल उद्योगाला बसला आहे, असे विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी आज केले. ऑटोमोबाइल क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण असून, काही कंपन्यांनी उत्पादन थांबवले आहे. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ऑटोमोबाइल क्षेत्रातील मंदी ही लोकांच्या मानसिकतेत झालेल्या बदलामुळे आणि बीएस-मुळे आली असल्याचे सांगितले. 

पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, "वाहन क्षेत्रातील घसरणीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. बीएस-च्या निकषांपासून वाहन नोंदणी शुल्क आणि लोकांची मानसिकता आदी घटकांचा त्यात समावेश आहे. हल्लीच्या काळात कर्ज काढून गाडी घेण्यापेक्षा अनेक जण मेट्रो अथवा ओला-उबरसारख्या कॅबमधून प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत.'' 

ऑटोमोबाइल क्षेत्रात होणारी आर्थिक घसरण गंभीर समस्या असल्याचेही सीतारमन यांनी मान्य केले. "आम्ही सर्वच क्षेत्रांतील समस्यांबाबत गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले. या समस्यांचे निराकरण होण्यासाठी सरकार आवश्‍यक पावले उचलणार असून, हे सरकार सर्वांचेच ऐकते. आवश्‍यकता भासल्यास आणखी काही घोषणा केल्या जातील,'' असेही सीतारमन यांनी स्पष्ट केले. 

याआधी "मारुती"चे अध्यक्ष भार्गव यांनी ओला-उबरसारख्या सेवांमुळे मोटारींचा विक्री घटली असल्याचा दावा खोडून काढला होता. मोटारींची विक्री घटण्यामागे सरकारचे धोरणही कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले होते. पेट्रोल-डिझेलवर असलेले भरमसाट कर, अतिरिक्त रस्ते कर आदींमुळेही मोटार खरेदीकडे कल नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millennials Prefer Ola, Uber To New Cars: Finance Minister On Auto Crisis