lotus valley indore travel
sakal
जेव्हा आपण भारतातील सुंदर दऱ्यांचा किंवा 'व्हॅली'चा विचार करतो, तेव्हा काश्मीरची 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' किंवा हिमाचलमधील पर्वतरांगा डोळ्यासमोर येतात. मात्र, मध्य प्रदेशातील मिनी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूर शहरातही एक अशी जागा आहे, जिचे सौंदर्य पाहून तुम्ही काश्मीरलाही विसरून जाल. या जागेचे नाव आहे 'लोटस व्हॅली'. निसर्गाचा हा अनमोल ठेवा इतका विलोभनीय आहे की स्थानिक लोक याला प्रेमाने 'मिनी काश्मीर' असेही संबोधतात.