वीर दासच्या कार्यक्रमांना मध्य प्रदेशात बंदी, मंत्र्यांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vir Das

वीर दासच्या कार्यक्रमांना मध्य प्रदेशात बंदी, मंत्र्यांची माहिती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : स्टँण्डअप कॉमेडीयन वीर दासने (Vir Das) अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये भारताच्या सद्या परिस्थितीविषयी एक कविता म्हटली. त्यामुळे तो सध्या ट्रोल होत आहे. त्याला अनेकांनी देशद्रोही देखील म्हटले आहे. त्याच्याविरोधात दिल्लीमध्ये तक्रार देखील दाखल कऱण्यात आली आहे. आता त्याच्या कार्यक्रमांना मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh) देखील बंदी घालण्यात आली आहे. याबाबत मध्यप्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी माहिती आहे.

हेही वाचा: 'देशद्रोही' म्हणून ठपका बसलेला 'वीर दास' आहे कोण?

वीर दासने जॉन एफ केनेडी सेंटर ऑफ परफॉर्मिंग येथे सादर केलेल्या ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ या कार्यक्रमाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर टाकला होता. या व्हिडिओत तो म्हणतो, ‘‘मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते, तर रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो. मी अशा भारतातून आलो आहे, जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान आहे, पण आम्ही भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर धावून जातो. यानंतर तो प्रचंड ट्रोल झाला. आपल्या देशाबद्दल असे वक्तव्य करणे चुकीचे आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. तसेच त्याच्याविरोधात आदित्य झा नावाच्या व्यक्तीने दिल्लीतील टिळक मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस नेते कपिल सिब्बल आणि शशी थरूर यांनी मात्र या प्रकरणी वीर दासचे समर्थन केले आहे.

आम्ही अशा विनोदवीरांना परफॉर्म करू देणार नाही. त्याने माफी मागितली, तर त्याचे कार्यक्रम होणार की नाही याबाबत विचार करू. भारताला बदनाम करणारे अनेक विद्वान आहेत. त्यांचे समर्थक कपिल सिब्बल आणि काँग्रेसचे इतर लोक आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी देखील परदेशात भारताची बदनामी करतात. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख कमलनाथ देखील तेच काम करतात, असा आरोपही मिश्रा यांनी केला आहे.

loading image
go to top