
देशाचा कारभार चांगल्या पद्धतीनं करता यावा यासाठी 50 नवीन राज्ये निर्माण करायची मोदींची योजना आहे.
'कर्नाटक-महाराष्ट्राचे दोन तुकडे करण्याची भाजपची योजना'
बेळगांव (कर्नाटक) : सध्या महाराष्ट्रात मोठा राजकीय गदारोळ सुरु असतानाच कर्नाटकातील (Karnataka) ज्येष्ठ मंत्र्याचं एक धक्कादायक वक्तव्य समोर आलंय. 2024 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे केंद्रात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्राचे दोन तुकडे करायचे, अशी भारतीय जनता पक्षाची योजना आहे, असं धक्कादायक वक्तव्य भाजपचेच राज्य असलेल्या कर्नाटकातील ज्येष्ठ मंत्री उमेश कत्ती (Umesh Katti) यांनी आज केलं. उमेश कत्ती हे कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत.
कत्ती यांच्या वक्तव्यामुळं खळबळ माजलीय. देशाचा कारभार चांगल्या पद्धतीनं करता यावा यासाठी 50 नवीन राज्ये निर्माण करायची अशी मोदींची योजना आहे. ‘2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येतील. त्यानंतर महाराष्ट्राचे दोन, कर्नाटकचे दोन आणि उत्तर प्रदेशचे पाच तुकडे करून नवी राज्ये स्थापन करण्यात येणार आहेत, असं ते म्हणाले.
हेही वाचा: गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट; सुप्रीम कोर्टानं जाफरींची याचिका फेटाळली
कत्ती पुढं म्हणाले, देशात आणखी 50 राज्ये असावीत, अशी भाजपची (BJP) योजना आहे. उत्तर कन्नड हे स्वतंत्र राज्य निर्माण केलं जाणार आहे. बेळगाव बार असोशिएशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. उत्तरेकडील राज्यांप्रमाणेच दक्षिणेकडील राज्यांवरही आपला वरचष्मा प्रस्थापित करण्यासाठी तेथील राज्यांचं विभाजन केलं पाहिजे, अशी भाजपा नेत्यांची पूर्वीपासूनचीच मागणी आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Web Title: Minister Umesh Katti Big Statement About The Karnataka Maharashtra States
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..