esakal | शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; वाचा नव्या मंत्र्यांची नावे!

बोलून बातमी शोधा

Oath-Ceremony

शपथविधीनंतर कॅबिनेटची बैठक 

आम्ही सगळे एकच

शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; वाचा नव्या मंत्र्यांची नावे!
sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (गुरुवार) झाला. नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात अनेक चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे यातून काही नेतेमंडळी आनंदित आहेत तर काही पक्षावर नाराज आहेत. कमलनाथ सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नसल्याने ज्येष्ठ नेते बिसाहूलाल सिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षनिष्ठेमुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होत आहे.

बिसाहूलाल सिंह यांनी याबाबत सांगितले, की भाजप सरकारमध्ये प्रत्येक घटकाच्या विकासासाठी नक्कीच काम करणार आहे. पोटनिवडणूक हे माझ्यासाठी कोणतेही आव्हान नाही. 

आम्ही सगळे एकच

कमलनाथ सरकारमध्ये मंत्री राहिलेले प्रद्युम्न सिंह तोमर यांचाही शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. तोमर यांनी सांगितले, की पक्षाने जे काही निर्णय घेतले आहेत त्याचे आम्ही पालन करणार आहोत. तसेच काँग्रेसने आता आपल्या पक्षाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी...

शपथविधीपूर्वी आपल्या भावी मंत्र्यांच्या घरी चर्चा झाली. काही नेते तर सकाळीच मंदिरात दर्शनासाठी गेले. त्यांनी देवाचा आशीर्वाद घेतला. दिमनीचे आमदार गिर्राज दंडोतिया यांनी कात्याणी देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी सांगितले, की मी राज्याच्या विकासासाठी नक्कीच चांगले काम करेन. 

शपथविधीनंतर कॅबिनेटची बैठक 

राजभवनमध्ये सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्या नव्या सरकारची पहिली बैठक झाली.. 

शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी

- विजय शहा

- गोपाळ भार्गव

- जगदीश देवरा

- बिसालाललाल

- यशोधराज सिंधिया

- भूपेंद्र सिंह

- एडलसिंग कानशाना

- ब्रिजेंद्र प्रताप सिंह

- विश्वास सारंग

- इम्रती देवी

- प्रभूराम चौधरी

- डॉ. महेंद्रसिंग सिसोदिया

यांच्यासह अनेक नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.