
Kids Vaccination : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे मोठे विधान; म्हणाले...
नवी दिल्ली : भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने (DGCI) नुकतीच 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पालकांची काहीशी चिंता कमी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते. परंतु, आता यावर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandviya) यांनी मोठे विधान केले असून, 5 ते 12 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्रालय NTAGI आयोगाच्या शिफारशीची प्रतीक्षा करेल, असे म्हटले आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु होण्यासाठी पालकांना अजून काही दिवस प्रतीक्षा कारावी लागणार आहे. (Mansukh Mandaviya On Kids Corona Vaccination)
देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखाली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढवा बैठक पार पडली. त्यात मोदींनी लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यावर केंद्राचा भर असेल, असे म्हटले होते. त्यानंतर आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी वरील विधान केले आहे.
हेही वाचा: Rana Vs Raut : ''...तर हे असं आहे''; राऊतांचे आणखी एक ट्वीट
21 एप्रिल रोजी, DCGI च्या विषय तज्ञ समितीने (SEC) भारत बायोटेकला 2-12 वयोगटातील मुलांसाठी Covaxin लसीबाबत अतिरिक्त डेटा प्रदान करण्यास सांगितले होते. कोरोना विषाणूच्या शेवटच्या लाटेत लहान मुलांवर फारसा परिणाम झाला नाही, परंतु कोरानाच्या नवीन XE विषाणूची लागण होणाऱ्यांमध्ये लहानमुलांची संख्या लक्षणीय आहे.
दरम्यान, शाळा सुरू झाल्यानंतर या विषाणुमुळे बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची भीती आहे. त्याशिवाय आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन आठवड्यांत मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे वाढली आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर कोव्हॅक्सीन लसीला मिळालेली परवानगी महत्त्वाची मानली जात असून, मंजुरी मिळाल्यानंतर, सरकार लवकरच लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करू शकते. ज्यामध्ये या वयोगटातील मुलांचे लसीकरण देशात केव्हा आणि कसे सुरू केले जाईल हे सांगितले जाईल. याशिवाय पॅनेलने 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी जैविक ई च्या कॉर्बेव्हॅक्सला आपत्कालीन वापराची अधिकृत मंजूर करण्याची शिफारस केली आहे.
Web Title: Ministry Of Health Will Wait For Ntagi Recommendation For Vaccination Of 5 To 12 Year Says Mansukh Mandaviya
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..