esakal | अदर पुनावालांच्या जीविताला धोका? Y सिक्यूरिटी देण्याचा गृहमंत्रालयाचा निर्णय

बोलून बातमी शोधा

अदर पुनावालांच्या जीविताला धोका? Y सिक्यूरिटी  देण्याचा गृहमंत्रालयाचा निर्णय
अदर पुनावालांच्या जीविताला धोका? Y सिक्यूरिटी देण्याचा गृहमंत्रालयाचा निर्णय
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : सध्या देशात कोरोनाविरोधातला लढा सुरु आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण जगालाच आपल्या वेठीला धरलं आहे. या पार्श्वभूमीवर या लढ्यामध्ये विजयी होण्यासाठी महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे, ती म्हणजे लस! जगभरात निरनिराळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. भारतामध्ये देखील सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड तर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस महत्त्वपूर्ण मानली जात आहे. गृहमंत्रालयाने सीरम इन्स्टिट्यूटचे CEO अदर पुनावाला यांनी Y सिक्यूरिटी प्रदान करण्याचे आदेश दिले आहेत. CRPF द्वारे त्यांना ही सुरक्षा देण्यात येणार आहे.

हेही वाचा: सीरमच्या लशीची किंमत 100 रुपयांनी कमी; आदर पुनावालांनी केलं ट्विट

सुरक्षा कशासाठी?

सध्या जगभरात प्राधान्याचा विषय कोणता असेल तर तो म्हणजे कोरोनाविरोधातील लढ्याचा! पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे या इन्स्टिट्यूटला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. अदर पुनावाला हे या कंपनीचे CEO आहेत. सध्या महत्त्वाच्या जागी आणि प्रकाशझोतात असणाऱ्या अदर पुनावाला यांच्या जीविताला धोका संभवू शकतो. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात असणारे सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाच्या कोविशील्ड लशीची निर्मिती करत आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लशीची किंमत वेगवेगळी ठरवली होती. मात्र, आता या लशीची किंमत 100 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. राज्य सरकारला ही लस 400 रुपयांना मिळणार होती. मात्र, आता या लशीची प्रति डोस किंमत कमी करण्यात आली असून ती 300 रुपये करण्यात आली आहे.