esakal | रेल्वे कर्मचारी आता दोन शिफ्ट्समध्ये करणार काम
sakal

बोलून बातमी शोधा

Minister of Railways Ashwini Vaishnav

रेल्वे कर्मचारी आता दोन शिफ्ट्समध्ये करणार काम

sakal_logo
By
स्वाती वेमूल

रेल्वे मंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अश्विनी वैष्णव Minister of Railways Ashwini Vaishnav यांनी पहिला मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता रेल्वे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. हा नवीन आदेश केवळ मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांची पहिली शिफ्ट ही सकाळी ७ वाजता सुरू होईल आणि दुपारी ४ वाजता संपेल. तर दुसरी शिफ्ट ही दुपारी ३ वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री १२ वाजता संपेल. सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू नसेल. तर केवळ एमआर सेलला (मंत्री कार्यालय) हा आदेश लागू करण्यात आला आहे. (Ministry of Railways officials to work in two shifts)

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाचे एडीजीपीआर डीजे नारायण यांनी दिली. या नव्या आदेशामुळे रेल्वे कर्मचारी यापुढे रात्री १२ वाजेपर्यंत काम करताना दिसणार आहेत.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "भारतीय रेल्वे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे. रेल्वेवर त्यांचं लक्ष केंद्रीत असून त्याबाबत त्यांची काही स्वप्नं आहेत. ती सत्यात उतरवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे."

loading image