
बंगळुरूत एका नववीत शिकणाऱ्या मुलीनं आईवर गंभीर आरोप केले आहेत. विद्यार्थीनीचा आरोप आहे की, आईच माझा लैंगिक छळ करत आहे. आई शरीरसंबंध कसे ठेवायचे याचं ट्रेनिंग देत असल्याचा दावा तिने केलाय. हे ट्रेनिंग लग्नानंतर पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उपयोगी पडतील असंही आई सांगायची. मुलीचे हे गंभीर आरोप मात्र आईने फेटाळून लावले आहेत. आता या प्रकरणाची पोलीस चौकशी केली जात आहे.