मुलासोबत पळून गेली...गावकऱ्यांनी केलं मुंडन, काळं फासून काढली धिंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

मुलासोबत पळून गेली...गावकऱ्यांनी केलं मुंडन, काळं फासून काढली धिंड

गुजरातमधील पाटन जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका गावातील अल्पवयीन मुलीने पुरुषासोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे पलायन केलं. त्यानंतर गावकऱ्यांनी तिला प्रियकरासह पडकलं. गावकऱ्यांच्या हाती सापडल्यानंतर स्थानिकांनी मुलीच्या तोंडाला काळं फासल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच स्थानिकांनी मुलीचं मुंडन केल्याचा आरोपही करण्यात आलाय. हारजी गावात १० नोव्हेंबर रोजी घडलेल्या कथित घटनेच्या संदर्भात आतापर्यंत किमान २२ जणांना अटक करण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. टीव्ही 18 ने यासंदर्भात वृत्त दिलंय.

वाडी जमातीच्या लोकांनी मुलगी प्रियकरासह पळून गेल्याची शिक्षा म्हणून तिचे मुंडन केले. या लोकांचा दावा आहे की मुलीने अशा कृत्याने आपल्या जमातीची बदनामी केलीय. त्यातूनतच गावकऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.

ती रडत होती. तरीही शुद्धीकरणाच्या नावाखाली तिचे...

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक तिचं मुंडन करत आहेत. तसेच चेहऱ्यालाही काळं फासण्यात आलंय. मुलीचं शुद्धीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं काहींनी सांगितलंय. यामध्ये मुलगी रडताना दिसत आहे. गावकऱ्यांनीही शिक्षा म्हणून तरुणी आणि तिच्या प्रियकराला गावभर फिरवलं. त्यांची धिंड काढण्यात आली,अशी माहिती पोलिसांनी दिली.

पुन्हा लावून दिला विवाह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारानंतर लगेचच मुलीच्या कुटुंबीयांनी तिला त्याच समाजातील दुसऱ्या पुरुषाशी लग्न करण्यास भाग पाडलं. पोलीस अधीक्षक (पाटन) अक्षयराज मकवाना म्हणाले, "आम्ही या संदर्भात 35 गावकऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे आणि 22 जणांना अटक केली आहे." मुलगी ज्या व्यक्तीसोबत पळून गेली होती, त्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि बाल लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीवर मुलीचे अपहरण करून तिला खेडा जिल्ह्यातील डाकोर येथे नेऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे.

loading image
go to top