
नववीत शिकणाऱ्या एका मुलीनं शाळेच्या स्वच्छतागृहातच एका बाळाला जन्म दिल्यानं खळबळ उडालीय. धक्कादायक बाब म्हणजे ज्या सरकारी शाळेत २० स्टाफ आहे, त्या स्टाफमध्ये १३ महिला असूनही कोणालाही ती गर्भवती असल्याचं माहिती नव्हतं आणि शंकाही आली नव्हती. कुटुंबियांनासुद्धा याबाबत कल्पना नसल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. तेलंगनात ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. सध्या मुलीसह बाळ रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.