
नवी दिल्ली : अठरा वर्षांखालील मुलांना यापुढे समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) अकाऊंट सुरु करण्यासाठी त्यांच्या पालकांची संमती घ्यावी लागेल. संसदेने ऑगस्ट २०२३ मध्ये मंजूर केलेल्या डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्यातील नियमांच्या मसुद्यात ही तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हा मसुदा जारी केला. या नियमांनुसार मुलांना समाजमाध्यमांवरील अकाऊंट सुरु करण्यासाठी पालकांची परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.