
कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आज भाजपचे नेते आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी हल्लाबोल केला. अन्य राज्यात बंगाली भाषिक कामगारांवर हल्ले होत असल्याचा ममता बॅनर्जी यांचा दावा बिनबुडाचा असून राजकीय फायद्यासाठी व भिती पसरवण्यासाठी आहे, असे मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.