

TVK MLA VS Babu, who defeated DMK chief MK Stalin in the Kolathur Assembly election, has passed away, paving the way for a by-election in the constituency
esakal
तामिळनाडूच्या राजकारणात कोलाथूर विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे आमदार व्ही. एस. बाबू यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर द्रमुकचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन पुन्हा एकदा कोलाथूरमधून निवडणूक लढवणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.