भगव्या कपड्यातल्या जमावाकडून मदर तेरेसा शाळेची तोडफोड, शिक्षकांना मारहाण; जाणून घ्या प्रकरण?

Mob vandalised missionary school: शाळेतील दोन कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाचा समावेश आहे.
school in Telangana
school in Telangana

हैदराबाद- तेलंगणाच्या मंचेरियल जिल्ह्यातील एका मिशनरी शाळेची तोडफोड आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने काही विद्यार्थ्यांना शाळेत भगवे कपडे परिधान केल्याबद्दल विचारणा केली होती. त्यानंतर हा प्रकार झाल्याचं कळत आहे. (mob vandalized missionary school in Telangana over students wearing religious attire to campus)

विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना याबाबत सांगितले होते. याप्रकरणी शाळेतील दोन कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाचा समावेश आहे. धार्मिक भावना दुखावणे आणि दोन गटामध्ये धार्मिक मुद्द्यावरुन तेढ निर्माण करणे या कलमाखाली मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावाच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केलेली नाही.

school in Telangana
Viral Video: तो मारत होता, मित्र हसत होते अन्... विद्यार्थ्याने अनेकवेळा लगावले शिक्षिकेच्या कानशिलात; पाहा संतापजनक व्हिडिओ

हैदराबादपासून २५० किलोमीटर दूर असलेल्या कन्नेपाल्ली गावातील मदर तेरेसा शाळेतील हा प्रकार आहे. शाळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक जेमोन जोसेफ हे केरळचे रहिवाशी आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी काही विद्यार्थी शाळेत भगवे कपडे घातल्याचं दिसून आलं होतं. याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना विचारणा केली. विद्यार्थ्यांनी सांगितलं की ते हनुमान दिक्षा घेत असून २१ दिवसांचा विधी करत आहेत. त्यानंतर मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पालकांना घेऊन शाळेत येण्यास सांगितलं होतं.

काहींनी याप्रकरणी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. यात दावा करण्यात आला होता की मुख्याध्यापक शाळेत भगवे कपडे घालून येण्यास मनाई करत आहेत. त्यानंतर हे प्रकरण चिघळले. जमावाने शाळेवर हल्ला केला. व्हिडिओमध्ये दिसतंय की, काही भगवे कपडे घातलेले लोक जय श्रीरामची घोषणा देत शाळेची तोडफोड करत आहेत.

school in Telangana
Viral Video: भांडी घासायचा कंटाळा आलाय; भावाने एकदम भारी जुगाड शोधून काढलाय, हर्ष गोयंकांनी घेतलीये दखल

घाबरलेले शिक्षक जमावाला काही न करण्याची विनंती करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. एकाने मदर तेरेसा यांच्या पुतळ्यावर दगड मारल्याचं देखील एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. सदर घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही लोकांनी मुख्याध्यापक जोसेफ यांना घेरलं. त्यांना मारहाण करण्यात आली. शिवाय त्यांच्या माथ्यावर बळजबरीने टीळा लावण्यात आला. जमावाने शाळा प्रशासनाकडून माफीची मागणी केली आहे. (Crime News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com