
Major Cabinet Decisions by Modi Government: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार) पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत तीन मोठ्या निर्णयांना मंजुरी दिली आहे. केंद्रीय कॅबिनेटने कृषि अर्थव्यवस्था आणि अक्षय उर्जेच्या क्षेत्रात देशाला बळकट करण्यासाठी पावलं उचलली आहेत. यामध्ये पंतप्रधान धन-धान्य कृषि योजना (PMDDKY), NTPC, NLC इंडिया लिमिटेड (NLCIL) यांचा समावेश आहे, ज्यामध्ये सरकारने मोठी गुंतवणूक करण्याबद्दल बोलले आहे.
सरकार कृषी योजनेवर २४ हजार कोटी खर्च करणार आहे. धन-धान्य कृषी योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणणे आहे. याअंतर्गत, कृषी जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ३६ केंद्रीय योजनांच्या समन्वयातून सरकार दरवर्षी २४ हजार कोटी रुपये खर्च करेल, असे सांगितले गेले आहे. केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे.
केंद्र सरकारच्या मते, ती फलोत्पादन योजना असो किंवा शेती असो किंवा इतर योजना असो, जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्वांना एकत्र आणून काम केले जाईल. यासाठी १०० जिल्हे निवडण्यात आले आहेत, ज्यामध्ये जिल्हा, ब्लॉक आणि राज्य पातळीवर सतत देखरेख केली जाईल.
एनएलसीआयएल आणि एनटीपीसीमध्ये गुंतवणुकीला मान्यता दिली गेली आहे. अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात विस्तार करण्यासाठी एनएलसी इंडिया लिमिटेड (एनएलसीआयएल)ला ७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे, एनएलसीआयएल त्यांच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी, एनएलसी इंडिया रिन्यूएबल्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक करू शकतील आणि त्या बदल्यात एनआयआरएल विविध प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करेल.याशिवाय, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकारने हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी एनटीपीसीला २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.