Modi Govt : मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण; 2024 ची लोकसभा जिंकण्यासाठी असा असेल भाजपचा मेगा प्लॅन!

निवडणुकांसाठी भाजपने देशभरात महासंपर्क अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाद्वारे ते वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोकांसोबत संपर्क साधणार आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modisakal

Modi Govt : मागच्या ९ वर्षापासून देशात भाजपची सत्ता असून येत्या आठ ते दहा महिन्यात लोकसभा निवडणुकात पार पडणार आहेत. भाजपच्या सत्तेची ९ वर्षे पूर्ण झाली असून येत्या लोकसभा निवडणुकासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांसाठी भाजपने देशभरात महासंपर्क अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाद्वारे ते वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोकांसोबत संपर्क साधणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन मोदी सरकारने हे अभियान चालू केले असून त्याद्वारे कमजोर मतदारसंघ मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांकडे चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात येणार आहे. तर प्रत्येकाला एका मतदारसंघात दोन दिवस राहून प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

PM Narendra Modi
9 Years Of Modi Government : नऊ वर्षात घेतलेल्या 'या' निर्णयांमुळे आजही मोदींना हरवणं जवळपास अशक्य; वाचा सविस्तर

कोणत्या मंत्र्यांकडे कोणत्या राज्याची जबाबदारी?

दरम्यान, एका महिन्यामध्ये हे मंत्री आठ दिवसांसाठी लोकसभा मतदार संघात राहतील. केंद्रीय मंत्री हार्दिक सिन्हा पुरी यांच्याकडे जम्मू काश्मीर. एस. जयशंकर यांच्याकडे दिल्ली, निर्मला सीताराम यांच्याकडे कर्नाटक, भूपेंद्र यादव, ज्योतीरादित्य सिंधिया यांच्याकडे महाराष्ट्र, पियुष गोयल, राजनाथ सिंह आणि नरेंद्र तोमर यांच्याकडे उत्तरप्रदेश, धर्मेंद्र प्रधान आणि स्मृती इराणी यांच्याकडे पश्चिम बंगाल, अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे पंजाब, मुरलीधरण यांच्याकडे आंध्र प्रदेश आणि किरण रिजीजू यांच्याकडे आसामची जबाबदारी देण्यात आली आहे.

PM Narendra Modi
9 Years Of Modi Govt. : दबंग पंतप्रधान! मोदींनी 9 वर्षात केलेले 9 साहस ज्यामुळे जगाला केले चकित

काय असेल भाजपची रणनिती?

ज्या मतदारसंघामध्ये भाजपचा पराभव झाला आहे किंवा ज्या मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार कमी मतांनी निवडून आले आहेत अशा मतदारसंघावर जास्त भर देण्यात येणार आहे. हे मंत्री या मतदारसंघामध्ये जाऊन जनसंपर्क वाढवण्यावर भर देणार असून लोकांमध्ये जाऊन त्यांच्याकडून भाजपच्या कारकिर्दीतील कामाचा लेखाजोखा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांचे अभिप्रायदेखील घेण्यात येणार आहेत.

PM Narendra Modi
9 Years of Modi Govt : मोदींच्या ९ वर्षात देश कसा बनला 'डिजिटल इंडिया'? हे सहा निर्णय ठरले महत्त्वाचे

या अभियानामध्ये घराघरांमध्ये जाऊन किमान 250-300 प्रतिष्ठित लोकांची यादी तयार केली जाईल, ज्यामध्ये पद्म पुरस्कार विजेते, खेळाडू, डॉक्टर, उद्योगपती, शहीदांच्या कुटुंबांचा समावेश असेल. 21 ते 30 जून या कालावधीत सर्व घरांमध्ये शासनाच्या कामगिरीच्या पुस्तिका पोहोचविण्याची योजना आहे. या माध्यमातून भाजप प्रत्येक मतदारसंघात प्रचार करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com