esakal | मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Modi, Shah

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय

sakal_logo
By
नामदेव कुंभार

लोकसभा पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रातील मोदी सरकारचा विस्तार होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजकीय हालचालींना वेगही आला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारने मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी आठ नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांचाही समावेश आहे. थावरचंद गहलोत कर्नाटकचे नवे राज्यपाल असणार आहेत. थावरचंद गहलोत यांच्याकडे केंद्रीय मंत्रिमंडळात सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय होतं. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारनं त्यांची उचलबांगडी केली आहे.

हेही वाचा: फडणवीस केंद्रात, ठाकरे मुख्यमंत्री; शिवसेना-भाजपची पुन्हा युती?

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅबिनेटची बैठक घेणार आहेत. यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार आहे. नव्या मंत्रिमंडळविस्तारात अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचं बोललं जात आहे. आजच्या मोदी सरकारच्या निर्णायावरुन याची प्रचितीही आली आहे. नव्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मंत्रिमंडळातील अनेक अकार्यक्षम नेत्यांना डच्चू मिळू शकतो. या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या बदल्या किंवा नियुक्त्या झाल्याचं सांगितलं जात आहे. कॅबिनेटचा विस्तार झाल्यास, 2019 नंतर पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये नव्या मंत्र्यांची भर पडेल. त्यामुळे कॅबिनेटमध्ये काय फेरबदल होतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नवीन राज्यपालांची यादी -

थावरचंद गेहलोत, कर्नाटक

हरिभाऊ कंभमपती, मिझोराम

मंगुभाई छगनभाई पटेल, मध्य प्रदेश

राजेंद्र विश्वनाथ अरलेकर , हिमाचल प्रदेश

पीएस श्रीधरण पिल्लाई, गोवा

सत्यदेव नारायण आर्या, त्रिपुरा

बंदारु दत्तात्रय, हरियाणा

रमेश बैस, झारखंड

हेही वाचा: फडणवीस केंद्रात, ठाकरे मुख्यमंत्री; शिवसेना-भाजपची पुन्हा युती?

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१९ मध्ये घवघवीत बहुमत मिळवून सलग दुसऱ्या वेळेस केंद्रातील सत्ता मिळविली. त्यानंतर होणारा हा पहिलाच प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तार असल्याने त्याबद्दल जबरदस्त उत्सुकता आहे. साधारणतः पुढील दोन दिवसांत निश्चित मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगितले जाते आहे. मोदी यांच्या विस्तारित टीममध्ये साधारणतः 20 ते 21 नव्या नावांना सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे.

loading image