RSS chief Mohan Bhagwat
esakal
RSS News: ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गणवेशाचा वापर करण्यात येत असला आणि शारीरिक कसरतींना प्राधान्य दिले जात असले तरीसुद्धा संघ ही काही निमलष्करी संघटना नाही. भाजपकडे पाहून संघाचे आकलन करून घेण्याचा प्रयत्न करणे हीदेखील एक मोठी चूक ठरेल,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा.स्व.संघ) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केले.