Mohan Bhagwatsakal
देश
Mohan Bhagwat : हिंदू हा देशातील जबाबदार समुदाय; मोहन भागवत : देशाचे ऐक्य टिकवण्यात महत्त्वाचे योगदान
RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू समुदायाची जबाबदारी लक्षात आणून दिली आणि त्यांच्यासाठी संघटित होण्याचे महत्त्व सांगितले. एकतेत विविधता समाविष्ट असल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले.
वर्धमान : ‘‘हिंदू हा या देशातील जबाबदार समुदाय असल्याने तो संघटित व्हावा यासाठी संघ प्रयत्नशील आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. एकतेत विविधता समाविष्ट आहे, असे हिंदू समाज मानतो, असे प्रतिपादनही भागवत यांनी यावेळी केले.