Woman Carrying Husband Viral Video: पत्नीने दिव्यांग पतीला खांद्यावर उचलून नेले; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर तातडीने मदत

Mohan Yadav Helps Disabled Man: दिव्यांग पतीला खांद्यावर उचलून जिल्हाधिकारी कार्यालयात नेणाऱ्या बिंदू बाई यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी तातडीने दखल घेतली.
Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav directs assistance for a disabled man and his family in Burhanpur.

Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav directs assistance for a disabled man and his family in Burhanpur.

esakal

Updated on: 

दिव्यांग पतीला खांद्यावर उचलून जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाणाऱ्या पत्नीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. त्यांच्या निर्देशानंतर बुरहानपूर जिल्हा प्रशासनाने दिव्यांग नागरिक दयाशंकर यांना ट्रायसायकल उपलब्ध करून दिली. तसेच त्यांच्या मुलींच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक आणि शैक्षणिक मदतही मंजूर केली.

Loading content, please wait...