Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

Mohan Yadav, Free Spectacles Distribution, TB Nutrition Support या उपक्रमांतर्गत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी हरदा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. नेत्रतपासणीत दृष्टीदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे प्रदान करण्यात आले.
cm mohan yadav free spectacles were distributed to girl students

cm mohan yadav free spectacles were distributed to girl students

esakal

Updated on: 

मध्य प्रदेश : तील हरदा जिल्हा रुग्णालयाला ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली. या वेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधून उपचारांबाबत माहिती घेतली. अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे, तर क्षयरोगाच्या (टीबी) रुग्णांना प्रत्येकी आठ किलो पोषण आहाराच्या टोपलीचे वाटप केले. उत्तम आरोग्य सेवा आणि व्यवस्थापनासाठी जिल्हा रुग्णालयाला मिळालेले ISO प्रमाणपत्रही त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com