Madhya Pradesh News: ‘रील’ बनवण्यापेक्षा प्रत्यक्ष समस्या सोडवा; नव्या डीएसपींना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

MP Police DSP Training : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी नव्या डीएसपी अधिकाऱ्यांना सोशल मीडियावर रील बनवण्यापेक्षा प्रत्यक्ष समस्या सोडवण्याचा सल्ला दिला. ४८ डीएसपींनी प्रशिक्षण पूर्ण केले असून, २०२९ पर्यंत राज्य अमली पदार्थमुक्त करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे
Madhya Pradesh CM Mohan Yadav Addresses Newly Trained DSP Officers at Police Academy

Madhya Pradesh CM Mohan Yadav Addresses Newly Trained DSP Officers at Police Academy

esakal

Updated on: 

मध्य प्रदेश : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा समाजातील प्रत्यक्ष समस्या सोडवण्याला प्राधान्य द्या, असा कर्तव्याचा संदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी नव्याने नियुक्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना दिला. भोपाळजवळील भौंरी येथील मध्य प्रदेश पोलीस अकादमीमध्ये ४४ व्या आणि ४५ व्या तुकडीतील उपपोलीस अधीक्षकांचा (डीएसपी) दीक्षांत समारंभ पार पडला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी संचलनाची सलामी स्वीकारली आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Loading content, please wait...