

Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav announces a ₹1 lakh grant after watching young Eklavya Gurukul students perform Mallakhamb at Sharad Utsav.
esakal
मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील गायत्री धाम (कलाल्दा) येथे आयोजित शरद उत्सवात एकलव्य गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी मलखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांचे शारीरिक संतुलन, एकाग्रता आणि धाडस पाहून मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री निधीतून एक लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली.
एकलव्य गुरुकुल आणि जिल्हा क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुकुलमधील तिसरी ते आठवीच्या वर्गांतील २० विद्यार्थ्यांनी एकल मलखांबासह सामूहिक पिरॅमिडच्या विविध रचना सादर केल्या. त्यांच्या सादरीकरणातून शारीरिक कौशल्याबरोबरच एकाग्रता, शिस्त आणि सांघिक समन्वयाचे दर्शन घडले.