Video: माकड बसते पोलिस अधिकाऱयाच्या डोक्यावर...

वृत्तसंस्था
Wednesday, 9 October 2019

एक माकड पोलिस चौकीमध्ये येऊन पोलिस अधिकाऱयाच्या डोक्यावर बसून त्यांचे मसाज करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश): एक माकड पोलिस चौकीमध्ये येऊन पोलिस अधिकाऱयाच्या डोक्यावर बसून त्यांचे मसाज करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पिलीभीत पोलिस चौकीचे पोलिस निरिक्षक हे आपल्या कामात व्यस्त असून, त्यांच्या डोक्यावर माकड बसत आहे. माकड त्यांच्या डोक्याची मसाज कतर असून, 53 सेंकदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ हजारो नेटिझन्सनी पाहिला असून, प्रतिक्रियांच्या माध्यमातूनही व्यक्त होत आहेत.

पोलिस निरिक्षक श्रीकांत द्विवेदी हे त्यांच्या कामात व्यस्त असताना दिसत असून, माकड त्यांच्या डोक्यावर बसलेले दिसत आहे. माकड त्यांचे केस चाळत असून, त्यांच्या कामात अडथळा आणत नाही. संबंधित क्लिप व्हायरल झाली असून, नागरिकांमध्ये माकडाची चर्चा सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monkey Sits on Indian Cops Shoulder and Gives Him a Free Hair Care