Monkeypox: लस तयार करण्यासाठी सीरम, भारत बायोटेक यांच्यात स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monkeypox: लस तयार करण्यासाठी सीरम, भारत बायोटेक यांच्यात स्पर्धा

Monkeypox: लस तयार करण्यासाठी सीरम, भारत बायोटेक यांच्यात स्पर्धा

कोरोनाप्रमाणेच आता मंकीपॉक्सच्या लसीबाबत देशातील दोन मोठ्या प्रसिद्ध कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. गेल्या वेळी, हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनी अँटी-कोरोनाव्हायरस कोवॅक्सिन बनवण्यात आघाडीवर होती. यावेळी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) लाही सरकारच्या सहकार्याने मंकीपॉक्सची लस बनवायची आहे. मात्र, या दोन्ही कंपन्यांनी अद्याप आपला दावा सादर केलेला नाही. तर या कंपन्यांनी आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत दावा केला आहे.

दोन्ही कंपन्यांनी आरोग्यमंत्र्यांसमोर केले दावे

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्यासोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत भारत बायोटेक आणि सीरम या दोन्ही कंपन्यांनी मंकीपॉक्स लवकरात लवकर नष्ट करण्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांना थेट व्हायरसची आवश्यकता असेल ज्यामध्ये ICMR सहकार्य करेल असे सांगितले आहे.

हेही वाचा: मंकीपॉक्सच्या वाढत्या चिंतेत अदर पुनावालांचं मोठं विधान; म्हणाले, ''सीरमकडून...''

अंकलेश्वरमध्ये तयार होणार लस

बैठकीत भारत बायोटेक कंपनीचे अध्यक्ष डॉ.कृष्णा एला यांनी ही लस गुजरातमधील अंकलेश्वर येथे बनवण्यात येणार असल्याचे सांगितले. आतापर्यंत जगात फक्त दोनच ठिकाणी ही लस बनवली जाऊ शकते, एक अंकलेश्वर आणि दुसरी बव्हेरियन नॉर्डिक, जर्मनी.

प्रत्येक डोसवर रॉयल्टी

कोवॅक्सिनच्या प्रत्येक डोसवर ICMR ला ५% रॉयल्टी दिली जात आहे. तसेच मंकीपॉक्सच्या लसीवर फार्मा कंपनीला रॉयल्टी भरावी लागणार आहे. ती किती टक्के असेल? ते करारानंतर कळेल. सीरम कंपनीचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले की, त्यांच्या कंपनीने मंकीपॉक्सच्या लसीचा शोध वेगाने सुरू केला आहे. त्यासाठी अमेरिका आणि युरोपातील शास्त्रज्ञांशी संपर्क साधला जात आहे.

हेही वाचा: दिल्लीत मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण; देशातील रुग्णांची संख्या नऊवर

Web Title: Monkeypox Competition Between Serum Bharat Biotech To Develop Vaccine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..