
Monkeypox News : मंकीपॉक्सचा सेक्सशी संबंध; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला
नवी दिल्ली : कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नाही तोच देशात मंकीपॉक्सने (monkeypox) थैमान घातले आहे. केरळपाठोपाठ राजधानी दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयातही या विषाणूने त्रस्त असलेला रुग्ण दाखल आहे. शरीरावर लाल पुरळ येण्याव्यतिरिक्त या आजाराची लक्षणे कोणती आहेत? हा विषाणू कसा पसरतो? सेक्सशी (Physical Relation) काय संबंध आहे? मंकीपॉक्सशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत. (monkeypox Latest Marathi News)
मंकीपॉक्सचा (monkeypox) संसर्ग कोणालाही होऊ शकतो. मात्र, त्याचे सेक्स कनेक्शनही समोर आले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या रुग्णांमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. तसेच ते गे म्हणजेच इतर पुरुषांशी शारीरिक (Physical Relation) संबंध होते. डॉ. राम मनोहर लोलिया रुग्णालयातील त्वचाविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. करिब सरदाना यांनीही सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्याचा सल्ला (Doctors Advice) दिला आहे. मंकीपॉक्स आणि असुरक्षित सेक्सचा संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जर्नल ऑफ मेडिकल व्हायरोलॉजीने युरोप आणि यूकेमधील सहा क्लस्टर्सच्या विश्लेषणात असे आढळून आले की हा संसर्ग पुरुषांमध्ये होतो. त्याचा परिणाम चेहरा, पाय किंवा हातांपेक्षा गुप्तांगांवर जास्त दिसून आला. यूके आणि न्यूयॉर्क शहरातील डेटानंतर लैंगिक संपर्काबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात आहेत. विशेषतः कंडोम वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.
हेही वाचा: तुमची सत्ताही कधीतरी जाणारच; मग...; अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी
संसर्ग कसा पसरतो
मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा विषाणू पसरतो.
विशेषतः संक्रमित व्यक्तीच्या शरीरावर आलेल्या लाल पुरळला स्पर्श केल्यास.
हा संसर्ग संक्रमित व्यक्तीच्या शिंक किंवा खोकल्यातून संक्रमित होऊ शकतो.
मंकीपॉक्सची लक्षणे
मंकीपॉक्सची लक्षणे संसर्ग झाल्यानंतर ५ ते २१ दिवसांच्या आत दिसतात.
मंकीपॉक्स संसर्गानंतरची प्राथमिक लक्षणे म्हणजे खूप ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पाठदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा.
तसेच शरीरावर लाल पुरळ दिसतात.
चेहऱ्याशिवाय शरीराच्या इतर भागांवरही लाल पुरळ दिसून येते.
गुप्तांगांवरही पिंपल्स येतात.
काय करावे?
लैंगिक आरोग्याविषयी जोडीदाराशी बोला आणि कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याची खात्री करा.
मंकीपॉक्सची लक्षणे असल्यास लैंगिक संबंध ठेवू नका आणि इतर कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू नका.
कोणाला लक्षणे दिसत असल्यास टॉवेल शेअर करू नका.
एक मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवा.
आजारी आणि बेघर जनावरांपासून दूर राहा.
मंकीपॉक्सवर उपचार काय?
सहसा हा संसर्ग स्वतःहून बरा होतो.
काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता पडू शकते.
अँटिबायोटिक्स, पेनकिलर आणि इतर औषधांद्वारे आराम दिला जातो.
मंकीपॉक्सपासून संरक्षण करण्यासाठी नवीन लस मंजूर करण्यात आली आहे.
चेचक लस देखील प्रभावी दिसून आली आहे.
Web Title: Monkeypox Physical Relation Doctors Advice
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..