Monsoon 2022 Update I मान्सूनसाठी अनुकूल वातावरण, यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मान्सूनसाठी अनुकूल वातावरण, यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार

मान्सूनसाठी अनुकूल वातावरण, यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार

सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. लोक गरमीमुळे हैराण झाले आहेत. दरम्यान, यंदा वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंदमानच्या समुद्रात मान्सुनसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले असल्याने मान्सून लवकर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बातमीमुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या लोकांसाठी दिलासा मिळणार आहे. त्यामुळे यावर्षी अनेकांना मान्सूनचा आनंद घेता येणार आहे.

यंदा अंदमानमध्ये १० दिवस आधी दाखल मान्सुन होणार आहे. मे अखेरीस तो केरळमध्ये दाखल होणार असून साधारण जुनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या वातावरणात प्रचंड प्रमाणात गरमीचे वातावरण असून यामुळे लोकांना उष्णतेच्या लाटेचाही सामना करावा लागत आहे. अधून मधून पावसाच्या सरीही राज्यातील काही भागात बरसत असतात.

हेही वाचा: चंद्रकांत पाटलांनाच सरकारने राज्याचे वकील म्हणून उभं करावं- शिवसेना

मागील वर्षी मान्सूनने दोन दिवसांच्या उशिराने केरळमध्ये हजेरी लावली होती. यंदा मात्र लवकर दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशमधील काही भागांमध्ये जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मॉन्सून साधारणत: 1 जूनपर्यंत केरळला पोहोचतो. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सुन महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता आहे.

जूनच्या मध्यापर्यंत मॉन्सूनच्या प्रगतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण ओडिशाचा काही भाग व्यापला जाईल. इतकंच नाहीतर हिमालयीय पश्चिम बंगालमध्येही मान्सूनचा पाऊस पडेल. जुलैच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण देशात हजेरी लावेल. दरम्यान, येणारा पावसाळा सलग देशभरात समाधानकारक असेल, असा अंदाज 'स्कायमेट वेदर' या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा: केदारनाथचे दरवाजे उघडले, २ वर्षानंतर भाविकांना घेता येणार दर्शन

Web Title: Monsoon 2022 Update Kerala Will Arrive And June First Week Entry In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top