Karnataka Monsoon Update: कर्नाटकात मॉन्सूनचा जोर वाढला; किनारपट्टी प्रदेशात आपत्तिनिवारण पथके, शाळांना सुटी जाहीर
Heavy Rainfall : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन केरळसह कर्नाटकमध्ये झाले असून, जोरदार पावसामुळे सहा जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. कोस्टल, मलनाड व कोडगू भागात मुसळधार पावसाचा इशारा; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी आणि एनडीआरएफची तैनाती.
बंगळूर : नैऋत्य मॉन्सून केरळसह कर्नाटकात दाखल झाला आहे. त्याचबरोबर राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढला आहे. किनारी, मलनाड आणि कोडगू भागात सतत पाऊस पडत आहे.