Monsoon Session : राज्यसभेतून आणखी तीन खासदार निलंबित; २७ जणांवर कारवाई

Rajya Sabha Marathi news
Rajya Sabha Marathi newsRajya Sabha Marathi news

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या तीन खासदारांना राज्यसभेतून (Rajya Sabha) निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. यामध्ये आपचे दोन खासदार संदीप पाठक आणि सुशील गुप्ता यांचा समावेश आहे. याशिवाय अपक्ष खासदार अजितकुमार भुयान यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी संजय सिंह यांनाही निलंबित केले होते. राज्यसभेच्या कामकाजात आतापर्यंत २३ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

संजय सिंह यांच्याशिवाय आज निलंबित (Suspended) केलेल्या तीन खासदारांना या आठवड्यापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. पुढील आठवड्यापासून म्हणजेच सोमवारपासून हे खासदार सभागृहाच्या (Rajya Sabha) कामकाजात भाग घेऊ शकतील. याशिवाय मंगळवारी निलंबित केलेल्या १९ खासदारांवर चालू आठवडाभरासाठी कारवाई करण्यात आली आहे.

Rajya Sabha Marathi news
Monkeypox Vaccine : मंकीपॉक्स लसीवर नीती आयोगाचे सदस्य पॉल यांनी दिले उत्तर

यापूर्वी लोकसभेतील (Loksabha) ४ खासदारांना अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. गैरवर्तन केल्याप्रकरणी या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित केलेल्या खासदारांमध्ये टीएमसीच्या ७ आणि द्रमुकच्या ६ खासदारांचा समावेश आहे. निलंबन झाल्यापासून खासदार संसदेच्या आवारात धरणे देत आहेत.

टीएमसीच्या निलंबनाच्या कारवाईनंतर ‘तुम्ही आम्हाला निलंबित करू शकता, पण आवाज बंद करू शकत नाही’ असे ट्विट केले होते. आमच्या खासदारांना सार्वजनिक समस्या मांडायच्या होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित केले. हे किती दिवस चालेल, असे टीएमसीने म्हटले आहे. संसद पूर्णपणे विरोधकांपासून मुक्त व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे, असे सीपीआयचे खासदार बिनॉय विश्वम यांनी म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com