Ranchi Tourism : पावसाळ्यात रांचीच्या जंगलात पोहण्याचा थरार; हे ३ जलसौंदर्यस्थळे ठरतायत पर्यटकांचे आवडते ठिकाण

Ranchi Monsoon Tourism : पावसाळ्यात तिरू, सिकदिरी धबधबे आणि गुंगा नाल्यात वाढलेला पाण्याचा प्रवाह, हिरवाई आणि दाट जंगलामुळे रांची परिसरातील ही जलसौंदर्यस्थळे पर्यटकांसाठी पोहण्याचे आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्याचे हॉटस्पॉट ठरत आहेत
ranchi jungle waterfalls.

ranchi jungle waterfalls.

sakal

Updated on

झारखंड : पावसाळा सुरू झाला की निसर्गाचे रूपच बदलते. डोंगर, दाट जंगल, हिरवळ आणि धबधब्यांमधून वाहणारे पाणी यामुळे झारखंडची राजधानी रांची आणि परिसरातील पर्यटनस्थळे सध्या पर्यटकांनी गजबजली आहेत. विशेषतः निसर्गाच्या सान्निध्यात पाण्याचा आनंद घेण्यासाठी तिरू धबधबा, सिकदिरी धबधबा आणि गुंगा नाला या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे.

रांचीच्या आसपास असलेल्या या नैसर्गिक ठिकाणांचे सौंदर्य पावसाळ्यात अधिक खुलते. डोंगरातून वाहणारे पाणी, आजूबाजूची हिरवाई आणि दाट जंगल यामुळे येथे गेल्यानंतर शहरापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात आल्याचा अनुभव मिळतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com