Thur, March 23, 2023

Siddhu Moosewala Murder Case : हत्येमागचा मास्टरमाईंड सापडला; परदेशातून घेतलं ताब्यात
Siddhu Moosewala Murder Case : हत्येमागचा मास्टरमाईंड सापडला; परदेशातून घेतलं ताब्यात
Published on : 2 December 2022, 4:09 am
प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येमागचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार याला आता ताब्यात घेण्यात आलं आहे. भारताच्या तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला कॅलिफॉर्नियामधून ताब्यात घेण्यात आलं आहे. गोल्डी ब्रारने मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली होती.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, काही आंतरराष्ट्रीय स्रोतांकडून भारतीय तपास यंत्रणांना याविषयीची माहिती मिळाली आहे. मात्र अद्याप कॅलिफॉर्नियाच्या सरकारकडून याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
मात्र रॉ, आयबी, दिल्ली पोलिस आणि पंजाबच्या तपास यंत्रणांना मात्र याबद्दल खात्रीशीर माहितची मिळाली आहे. गोल्डी ब्रार कॅलिफॉर्नियामध्ये सापडला असून त्याला तिथून ताब्यात घेण्यात आलं आहे.