esakal | देशात कोरोना लसीचे ४४ लाखांहून अधिक डोस वाया; 'या' राज्यांनी वापरले पूर्ण डोस

बोलून बातमी शोधा

देशात कोरोना लसीचे 44 लाखांहून अधिक डोस वाया; 'या' राज्यांनी वापरले पूर्ण डोस
देशात कोरोना लसीचे 44 लाखांहून अधिक डोस वाया; 'या' राज्यांनी वापरले पूर्ण डोस
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली

देशात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे अनेक लसीकरण केंद्र सध्या बंद आहेत. तर दुसरीकडे देशभरात लसीकरण मोहिमेदरम्यान तब्बल ४४ लाख डोस वाया गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांचं मात्र कौतुक करायला हवं कारण इथे एकही डोस वाया गेलेला नाही, त्यांच्या वाट्याला आलेल्या सर्व लसींचा त्यांनी वापर केला आहे, माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

हेही वाचा: Corona Vaccine: आत्ताच लस मिळत नाहीये, 1 मे नंतर काय होईल !

आरटीआय कार्यकर्ते विवेक पांडे यांनी केलेल्या माहिती अधिकाराअंतर्गत केलेल्या अर्जाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. या माहितीतून हे उघड झालं आहे की, देशभरात ४४.७८ लाख लसींचे डोस वाया गेले आहेत. तर लसीकरण मोहिम सुरु झाल्यापासून ११ एप्रिल २०२१ पर्यंत विविध राज्यांमध्ये १०.३४ कोटी डोस वापरण्यात आले आहेत.

तामिळनाडून गेले सर्वाधिक डोस वाया

या माहितीनुसार, तामिळनाडू राज्यात सर्वाधिक डोस वायाला गेले आहेत. यांमध्ये १०० डोसपैकी १२ म्हणजेच १२ टक्के डोस वाया गेल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर हरयाणा या राज्यात सर्वाधिक डोस वाया गेले आहेत. येथे हे प्रमाण ९ टक्के इतकं आहे. त्यानंतर पंजाब, मणिपूर आणि तेलंगणा या राज्यांमध्ये प्रत्येकी ८ टक्के लसींचे डोस वाया गेले आहेत. तर केरळ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मिझोराम, गोवा, दिव आणि दमण, अंदमान आणि निकोबार आणि लक्ष्यद्वीप या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एकही डोस वाया गेलेला नाही.

महाराष्ट्रात 'इतके' डोस गेले वाया

दरम्यान, लसीकरणात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात ३.२ टक्के (३.५६ लाख) डोस वाया गेले आहेत. तर राज्यात आजवर ९९ लाख लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. राजस्थानमध्ये ६ टक्के (६.१० लाख) डोस वाया गेले आहेत. या राज्यात ९५ लाखांहून अधिक लसीकरण पार पडलं आहे. त्याचबरोबर गुजरातमध्ये ३.८ टक्के (३.५६ लाख) डोस वाया गेले आहेत. येथे ९० लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेशात ५ टक्क्यांहून अधिक (४.९९ लाख) कोरोना प्रतिबंध लसीचे डोस वाया गेले आहेत. या राज्यात आजवर ८९ लाख लोकांना लस देण्यात आली आहे.