esakal | रिक्षा-ट्रक-टॅक्टरचा विचित्र अपघात, पाच जणांचा मृत्यु
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा-ट्रक-ट्रॅक्टरचा विचित्र अपघात, पाच जणांचा मृत्यु

रिक्षा-ट्रक-ट्रॅक्टरचा विचित्र अपघात, पाच जणांचा मृत्यु

sakal_logo
By
नामदेव कुंभार

उत्तर प्रदेशमधील श्रावस्ती येथे महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यु झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रिक्षाने धडक दिली. जोरदार धडकेमुळे रिक्षातील प्रवाशी रस्त्यावर फेकले गेले, अन् त्याचवेळी महामार्गावरुन भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकखाली चिरडले गेले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यु झाला. तर जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या विचित्र अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

उत्तर प्रदेशमधील श्रावस्ती येथील नारायणपुर गावात रात्री उशारा विचित्र अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यु झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. पोलिस आधिकारी अरविंद मौर्य यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, बलरामपूरमधील काही लोक दरगाह शरीफला गेले होते. शुक्रवारी रात्री उशारा ते रिक्षानेयेत होते. चालकाचा ताबा सुटल्यामुळे महामार्गाच्या बाजूला असलेल्या ट्रक्टरच्या ट्रॉलीवर रिक्षा धडकली. रिक्षा पलटल्यामुळे यामध्ये असणारे प्रवाशी रस्त्यावर फेकले गेले. याचवेळी महामार्गावरुन जाणाऱ्या ट्रकने चिरडले. यामध्ये पात जणांचा घटनास्थळावर मृत्यु झाला. तीन जण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यु पावलेले बलरामपूरच्या हासिमपारा येथील रहिवाशी आहेत. निजाम (35), किताबुल निशा (71), लिलाही (50), परवीन (25), रुबीना (25) यांचा मृत्यु झाला. तर सायरा बानो, आशमा, बसयुद्दीन हे गंभीर जखमी झाले आहेत.

loading image
go to top