esakal | चौदा राज्यांतील मृत्युदर एका टक्क्यापेक्षा कमी; कर्नाटक बनला नवा हॉटस्पॉट 
sakal

बोलून बातमी शोधा

mortality

देशातील 14 राज्यांतील मृत्यूदर एका टक्‍क्‍याहून कमी झाला असून राष्ट्रीय पातळीवरील कोरोना मृत्यूदर 1.4 टक्के म्हणजे जगात अजूनही सर्वांत कमी असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

चौदा राज्यांतील मृत्युदर एका टक्क्यापेक्षा कमी; कर्नाटक बनला नवा हॉटस्पॉट 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली  - अमेरिकेपाठोपाठ कोरोनाच्या जागतिक साथीचा सर्वाधिक फटका बसलेल्या भारतातून संसर्गाची घातकता कमी कमी होत आहे. देशातील 14 राज्यांतील मृत्यूदर एका टक्‍क्‍याहून कमी झाला असून राष्ट्रीय पातळीवरील कोरोना मृत्यूदर 1.4 टक्के म्हणजे जगात अजूनही सर्वांत कमी असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. नव्या रूग्णसंख्येत आज कर्नाटकने (8500) महाराष्ट्राला (7429) मागे टाकले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या 75 हजाराच्या खाली राहिली. सध्या 76,51,108 एकूण रुग्णांपैकी 7,40,090 सक्रिय कोरोनाग्रस्त असल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. राष्ट्रीय रिकव्हरी रेट 89 टक्‍क्‍यांजवळ पोहोचला आहे. आतापर्यंत मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 1 लाख 1,15 हजार 941 झाली आहे. यात 343 पोलिसांचाही समावेश आहे. 130 कोटींपैकी 9 कोटी 72 लाख 379 नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. सणासुदीच्या काळात आरोग्य नियमांची त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. 24 तासांत मृत्यूमुखी पडलेल्या 717 कोरोनाग्रस्तांपैकी 82 टक्के मृत्यू महाराष्ट्रासह 10 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांतील आहेत. महाराष्ट्रात एकूण मृतांच्या सर्वाधिक 29 टक्के (213) रुग्ण आहेत. याच 10 राज्यांतून 77 टक्के नवे रुग्ण आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image