
National Investigation Agency : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेले परप्पन अग्रहार तुरुंगातील मानसोपचारतज्ज्ञ नागराज, सहाय्यक उपनिरीक्षक चांद पाशा आणि संशयित दहशतवाद्याची आई फातिमा यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत दहशतवाद्यांच्या गटाने दहशतवादी नासिरला तुरुंगातून पळून जाण्यास मदत करण्यासाठी रचलेला एक भयानक कट उघडकीस आला आहे.