Nirbhaya Case : निर्भयाच्या आईला न्यायालयात अश्रू अनावर; म्हणाल्या...

वृत्तसंस्था
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

22 जानेवारीला पहिले डेथ वॉरंट

- अद्याप फाशी नाही

नवी दिल्ली : दिल्लीतील 'निर्भया' सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर आता दिल्ली न्यायालयात निर्भयाची आई आशादेवी यांना अश्रू अनावर झाले. आशादेवी यांनी या प्रकरणातील चारही दोषींविरोधात नवीन डेथ वॉरंट जारी करण्याची विनंती न्यायालयात केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निर्भयाच्या चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला विलंब होत असल्याने निर्भयाची आई आशादेवी यांनी न्यायालयात धाव घेतली आणि नव्या डेथ वॉरंट काढण्यासाठी याचिका दाखल केली. आशादेवी या आज (बुधवार) न्यायालयात हजर झाल्या. माझ्या हक्काचे काय? असा प्रश्न न्यायालयात उपस्थित केला. मीदेखील माणूस आहे, असे म्हणत त्यांना न्यायालयात अश्रू अनावर झाले.    

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

22 जानेवारीला पहिले डेथ वॉरंट

या प्रकरणातील चार दोषींविरोधात पहिले डेथ वॉरंट 22 जानेवारीला जारी करण्यात आले. त्यानंतर फाशीची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, वेळोवेळी विविध कारणांमुळे दोषींना अद्याप फाशी दिली गेली नाही. 

अद्याप फाशी नाही

निर्भया प्रकरणातील दोषींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर दुसरे डेथ वॉरंट जारी करत एक फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता दोषींना फाशी देण्यात येणार होती. मात्र, दोषींनी दया याचिका दाखल केली. त्यामुळे पुन्हा फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी टळली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother of Nirbhaya cried in Court