SC Decision : अपघात झालेल्या क्षेत्रातील MACT मध्ये क्लेम करण्याची गरज नाही; घराजवळील ट्रिब्यूनलमध्येही करू शकता अर्ज

Motor Accident Claim Tribunal : बंगालमध्ये झालेल्या एका अपघाताबद्दल यूपीमध्ये क्लेम करता येऊ शकतो, असा निर्णय कोर्टाने दिला.
SC Decision on Accident Claim
SC Decision on Accident ClaimeSakal

Accident Claim : वाहन अपघात झाल्यानंतर मोटार अ‍ॅक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलशी संपर्क साधणं आवश्यक असतं. दुर्घटनेची FIR रजिस्टर झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत MACT ला याबाबत माहिती द्यावी लागते. यानंतर ट्रिब्युनलकडून नुकसान भरपाई मिळते.

साधारणपणे ज्या ठिकाणी अपघात झाला, त्याच भागात असणाऱ्या MACT मध्ये अर्ज दाखल करण्यात येतो. मात्र, ही गोष्ट बंधनकारक नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. अर्जदार आपल्या घराच्या क्षेत्रात येणाऱ्या ट्रिब्युलमध्येही अर्ज करू शकतो असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी याबाबत निर्णय दिला.

SC Decision on Accident Claim
SC on Voter's Rights : मतदारांना उमेदवाराची माहिती जाणून घेण्याचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचं मत

काय आहे प्रकरण?

एका व्यक्तीचा पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये अपघात झाला होता. मात्र, ही व्यक्ती उत्तर प्रदेशच्या फतेहगढ शहराजवळ राहणारी आहे. त्यामुळे आपला क्लेम हा बंगालमधील MACT वरुन यूपीमध्ये ट्रान्सफर करावा अशी मागणी या व्यक्तीने केली होती. (Supreme Court on Accident Claim)

याचिकेला विरोध

या प्रकरणातील दुसऱ्या व्यक्तीने या याचिकेला विरोध केला होता. अपघात झाला त्याठिकाणी असलेले प्रत्यक्षदर्शी हे बंगाली भाषा बोलणारे होते. त्यामुळे यूपीमध्ये हे प्रकरण गेल्यास ते आपला जबाब नोंदवू शकणार नाहीत असं समोरच्या पक्षाने म्हटलं होतं.

SC Decision on Accident Claim
SC : विवाहित पुरुषांच्या वाढत्या आत्महत्या; 'राष्ट्रीय पुरूष आयोगा'च्या स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका मात्र फेटाळली. आपल्या देशात २२ अधिकृत भाषा आहेत. मात्र, कित्येक भागात हिंदी ही प्रामुख्याने बोलली जाते. त्यामुळे यूपीमध्ये असणाऱ्या ट्रिब्युनलसमोर हे आपलं बोलणं हिंदीमध्ये मांडू शकतात. जर ही याचिका मान्य केली, तर पहिल्या व्यक्तीला देखील आपली बाजू बंगालीमध्ये मांडावी लागेल, असं न्यायमूर्ती म्हणाले.

त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने बंगालमधील अपघाताचा क्लेम हा उत्तर प्रदेशच्या ट्रिब्युनलमध्ये केला जाऊ शकतो असा निर्वाळा दिला.

SC Decision on Accident Claim
Karnataka HC : 'बायकोला सांभाळता, मग आईला का नाही?', हायकोर्टाने दोन भावांना सुनावलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com