'सीमाभागात राष्ट्रपती राजवट लागू करा'; खासदार अरविंद सावंतांची लोकसभेत मागणी, मराठी भाषकांवर दडपशाही सुरु
MP Arvind Sawant : गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी लढा सुरू असून, मराठी भाषकांना न्याय मिळावा, यासाठी १९६९ मध्ये मोठे आंदोलन झाले. यावेळी ६७ हुतात्मे झाले.
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषकांना सन्मानाने जगता यावे त्यासाठी बेळगाव, कारवार, निपाणी आदी भागात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी गुरुवारी लोकसभेत केली आहे.