esakal | कमलनाथ सरकार कोसळले, देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
sakal

बोलून बातमी शोधा

MP CM Kamalnath have decided to tender my resignation to the Governor today

मध्य प्रदेशात काँग्रेस सरकारला धक्का बसला असून मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

कमलनाथ सरकार कोसळले, देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेस सरकारला धक्का बसला असून मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठी पडझड झाली होती. आज अखेर हे सरकार कोसळले असून, कमलनाथ बहुमत चाचणीला सामोरेच गेले नाहीत.  आज (ता. २०) मध्य प्रदेश सरकारची बहुमत चाचणी पार पडणार होती. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भाजपने काँग्रेसचे आमदार फोडले असल्याचा आरोप कमलनाथ यांनी भाजपवर केला व राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. गेल्या काही दिवसांमध्ये मध्य प्रदेशातील काँग्रेस सराकारला ग्रहण लागले होते. काँग्रेसचे २० ते २२ आमदार अचानक राजीनामा देऊन गायब झाले होते. 

या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर आरोप केले. भाजपने लोकशाहीचा गळा घोटला असा आरोप त्यांनी केला. काही वेळातच कमलनाथ राज्यपालांना भेटून राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण करणार आहे.  मध्य प्रदेशमध्ये आज (ता. २०) विश्‍वासदर्शक ठराव मांडण्याचे आदेश काल सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पण त्यापूर्वीच कमलनाथ यांनी आपला निर्णय जाहीर केला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केल्याने मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाला. त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडल्या.

loading image