Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav announces the 42nd Ladli Behna installment and an additional monthly incentive of ₹5,000 for eligible working women
esakal
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील पिछोर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ४२ वा हप्ता वितरित केला. या माध्यमातून राज्यातील १ कोटी २४ लाख ८१ हजार ५५० पात्र महिलांच्या बँक खात्यांत १ हजार ८३१ कोटी ७७ लाख रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा करण्यात आली. यावेळी महिला बचत गटांना २०० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. तसेच २२१ कोटी रुपये खर्चाच्या १२१ विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले.